लांजा येथील भाजपा पदाधिकारी संजय यादव यांच्या गणपती बाप्पाचे घेतले दर्शन
संतोष कोत्रे
लांजा-: महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटील यांच्या ९०% मागण्या मान्य केल्या आहेत. ज्या काही १०/२० टक्के मागण्या आहेत त्याला काही लीगल बेस आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सरकारला वेठीस धरू नये, अशी विनंतीवजा आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी लांजा येथे केले.
विधान परिषदेचे आमदार आणि भाजपाचे प्रवक्ते आमदार प्रमोद जठार यांनी आज मंगळवारी सकाळी लांजा शहरातील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते, माजी नगरसेवक संजय यादव यांच्या निवासस्थानी स्थानापन्न गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की,
भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे की, मोर्चा च्या परवानगीसाठी ते जसे कोर्टात गेले त्याचप्रमाणे उरलेल्या दहा-वीस मागण्यासाठी त्यांनी पुन्हा कोर्टात जावे. माननीय न्यायालयाने सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात समन्वय घडवून आणावा. आणि न्यायालयाने दूध का दूध पाणी का पाणी हे न्यायालयाने करावे. ही रस्त्यावरची लढाई त्यामध्ये लोकांना दावणीला बांधणे, गौरी गणपतीच्या काळात उत्सवाच्या काळात जरांगे यांनी सरकारला वेठीस धरू नये. गणपती बाप्पाने जरांगे पाटील यांना सुबुद्धी द्यावी, असे आमदार जठार म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, संजय यादव आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट-: विनायक राऊत पुन्हा आमदार, खासदार होणार नाहीत.- तशी आम्ही काळजी घेऊ
माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना आमदार प्रमोद जठार म्हणाले की, राज्य भाषा मराठी आहे. देशाची भाषा हिंदी आहे. आपली सनातन भाषा संस्कृत आहे.या सर्व भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी माणसा माणसातले भेद नष्ट करा.आज कोकण चालवायला आता नेपाळी मंडळी आली आहेत.आपण नेपाळला आपल म्हणतोय.
देशात राहणाऱ्या हिंदू धर्मियांना डिव्हाईड करण्याचा हा डाव आहे. यांच्या लक्षात आले आहे की मोदी आणि भाजप मंडळी सनातन हिंदू धर्म यावर ८०/ टक्के या देशातील सगळ्याची एकजूट करतील. त्यामुळे विनायक राऊत अफवा करतात.त्यांना भाषा वाद, प्रांत वाद, जातीपाती विखुरली जाण्याची घाई झाली आहे. काही मंडळीचा अजेंडा आहे.
जात, पंथ, भाषा याच्यावरती आता हिंदू एकवटला आहे सनातन संस्कृती एकवटलेली आहे दूर होणार नाही. विनायक राऊत पुन्हा आमदार खासदार होणार नाहीत याची काळजी आम्ही घेणार आहोत.












