जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत लांजा येथील कै. एकनाथ राणे हायस्कूलला तीन पदके

लांजा (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत लांजा येथील कै. एकनाथ राणे हायस्कूलने तीन पदके पटकावली.
रत्नागिरी जिल्ह्यास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा नुकत्याच राजापूर येथे पार पडल्या .या स्पर्धेसाठी कै. एकनाथ राणे हायस्कूल च्या ६ खेळाडूंची निवड झाली होती. त्यामध्ये शाळेने सिल्व्हर मेडल १ व 2 ब्राॅंझ मेडल अशा तीन पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत १७ वर्षे गट मुली गटात आर्या पवार तृतीय क्रमांक, स्वरा स्वप्नील डाफळे द्वितीय क्रमांक , गार्गी राणे चौथा क्रमांक,तर १७ वर्षे मुले गटात विराज जाधव तृतीय क्रमांक असे यश संपादन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंना लांजा तालुका तायक्वांदो कोच तेजस्विनी आचरेकर, तेजस पावस्कर , शीतल आचरेकर व क्रीडा शिक्षक सुशिल वासुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे संचालक कौस्तुभ राणे, मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा राणे , सौ प्रिया भागवत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे