केंद्र सरकारने UPI पेमेंटवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असून, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) मंगळवारी निवडक UPI व्यवहारांसाठी नवीन मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) फ्रेमवर्क जाहीर केलं आहे, त्यानुसार आता २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे QR कोड किंवा UPI द्वारे पेमेंट स्वीकारणाऱ्या पात्र व्यापाऱ्यांना 0.4 टक्के MDR भरावा लागू शकतो. सरकारने यासंदर्भात नियम जारी करून कोणत्या श्रेणीतील व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांना किती शुल्क द्यावे लागणार, हे स्पष्ट केले असून, विशेषतः सोनं-चांदी आणि दागिन्यांची खरेदी करताना अनेक ग्राहक UPI पेमेंटचा वापर करत असल्याने या नव्या नियमांचा ज्वेलरी खरेदीवर नेमका किती परिणाम होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
दागिन्यांच्या खरेदीवर किती MDR?
१ लाखांपेक्षा जास्त व्यवहारांवरही कमाल मर्यादा
१ लाख, २ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या पात्र UPI व्यवहारांसाठीही MDR ची कमाल मर्यादा ३०० रुपये इतकीच निश्चित करण्यात आली आहे, मात्र हा नियम फक्त संबंधित ज्वेलर्स नवीन MDR च्या कक्षेत येणारा पात्र व्यापारी असल्यासच लागू होईल.
छोट्या दुकानदारांना Zero MDR
दरम्यान, जे छोटे दुकानदार UPI QR द्वारे मासिक १ लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट स्वीकारतात आणि P2PM (Person-to-Person-Merchant) श्रेणीत येतात, त्यांच्यासाठी ‘शून्य MDR’ म्हणजेच Zero MDR लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत नियमांनुसार MDR हा थेट ग्राहकावर लादला जाणारे शुल्क नसून, हा खर्च व्यापाऱ्यानेच करायचा आहे आणि दुकानदारांनी MDR चा खर्च ग्राहकांकडून वसूल करू नये, याची खात्री करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.UPI ॲप प्रदात्यांनाही ग्राहकांकडून प्लॅटफॉर्म फी किंवा कोणतेही छुपे शुल्क आकारण्यास मनाई करण्यात आली असून, त्यामुळे एखाद्या सराफाने UPI द्वारे पेमेंट केल्यास अतिरिक्त 0.4 टक्के शुल्क लागेल असा दावा केल्यास ग्राहकाने त्याबाबत विचारणा करून त्याचे तपशीलवार बिल मागणे योग्य ठरेल.
किमतीवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो
मात्र प्रत्यक्ष व्यवहारात काही सराफ मेकिंग चार्जेसमध्ये बदल करून, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलती कमी करून किंवा व्यवसायातील इतर खर्चांमध्ये फेरफार करून आपला एकूण खर्च अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे ग्राहकांकडून थेट MDR वसूल केला जात नसला तरी त्याचा दागिन्यांच्या अंतिम किमतीवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे.
पेमेंट करण्यापूर्वी अंतिम बिल तपासा
त्यामुळे ग्राहकांनी दागिने किंवा सोनं-चांदी खरेदी करताना रोख रक्कम, UPI किंवा कार्ड यापैकी कोणत्याही पद्धतीने पेमेंट केल्यास अंतिम बिलाची रक्कम किती असेल, याची माहिती आधीच सराफाकडून घेणे आणि पेमेंट करण्यापूर्वी बिलामध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क जोडले आहे का, हे तपासणे योग्य ठरेल. हॉलमार्किंगच्या बेस शुल्कात वाढ करण्यात आली आहे, मात्र हॉलमार्किंग शुल्कामध्ये घडणावळ, घट अथवा वाया गेलेल्या सोन्याच्या शुल्काचा समावेश नसतो, त्यामुळे UPI पेमेंटसाठी स्वतंत्र MDR आकारला जात असल्यास तो ग्राहकाकडून का घेतला जात आहे, याबाबत सराफाकडे विचारणा करावी, असे एक्सपर्टने सांगितले आहे.













