मंडणगड प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सचिन थोरे यांनी 9 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर केली आहे. त्यानुसार सौ. मीरा घाडे गुहागर, नरेश रांगले दापोली, संदेश भुवड यांची मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. रामदास भागडे मंडणगड यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. दीनेश पोपलेकर खेड यांची चिटणीस पदी नियुक्ती झाली आहे. मोर्चाचे कार्यकारिणी सदस्यपदी संतोष दोडेकर खेड, नरेश तांबे मंडणगड, राजेंद्र चोरगे दापोली, स्वप्निल साठे दापोली, प्रितेश आरेकर दापोली यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्ह्यातील संघटन अधिक व्यापक व मजबुत करण्यासाठी वरिष्ठांचे संमत्तीने नियुक्ती प्रक्रीया पुर्ण करण्यात आल्याचे मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सचिन थोरे यांनी सांगीतले आहे. दरम्यान सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे जिल्हाध्यक्ष सतिश मोरे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन थोरे, यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
ओबीसी मार्चाचे जिल्हा सरचिटणीस पदी निवड झालेले रामदास भागडे यांचे अभिनंदन करताना जिल्हा अध्यक्ष सचिन थोरे व कार्यकर्ते












