विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
आचरा -अर्जुन बापर्डेकर
आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे रामेश्वर मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना दिमाखात झालीअसून यावर्षी 41 दिवस चालणारया गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त कीर्तन, आमने सामने डबलबारी भजन, फुगडी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, दर्जेदार ऑर्केस्ट्रा, विविध मंडळाचे दशवतार, भजने असे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे
या उत्सवात विविध कार्यक्रम होणार असून शनिवार २६ रोजी रात्री श्री ब्राह्मणदेव मिराशीवाडी व महापुरुष मित्रमंडळ वरचीवाडी पुरस्कृत संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग, मंगळवार २९ रात्री श्री भवानी डंपर सर्विस श्री. मनोज प्रकाश हडकर पुरस्कृत श्री दत्तमाऊली दशावतार सिंधुदुर्ग, यांचा दशावतार नाट्यप्रयोग, १ ऑक्टोबर रोजी रात्री ईश्वटी महापुरुष मंडळ जामडूल पुरस्कृत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ कवठी चेंदवण यांचा दशावतार नाट्यप्रयोग, शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी रात्री श्री ब्राह्मणदेव गाऊडवाडी मित्रमंडळ पुरस्कृत हेरंभ दशावतार सिंधुदुर्ग यांचा दशावतार नाट्यप्रयोग, रविवार ४ ऑक्टोंबर रोजी रात्री डोंगरेवाडी पुरस्कृत आमने सामने महिला डबलबारी भजनाचा जंगी सामना, सोमवार ५ ऑक्टोंबर रोजी रात्री शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स बाणे पुरस्कृत लोकराजा श्री. सुधिर कलिंगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा दशावतार नाट्यप्रयोग, मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी रात्री हिर्लेवाडी विकास मंडळ पुरस्कृत स्वरधारा संगीत गायन मैफिल, गायक- विनय वझे (आचरा) आणि सहकारी, बुधवार ७ ऑक्टोंबर रोजी रात्री सत्यवान परब पुरस्कृत गुरुकृपा दशावतार कला नाट्य मंडळ हळवळ दशावतार यांचा दशावतार नाट्यप्रयोग, शनिवार १० ऑक्टोंबर रोजी रात्री राजन पुजारे मित्रमंडळ प्रायोजिक खुली समूह नृत्य स्पर्धा. प्रायोजक- श्री. राजन पुजारे, श्री. बाबू हडकर, श्री. प्रकाश मेस्त्री, श्री. दिपक सुर्वे, श्री. विनोद गवळी, श्री. यल्लापा गुरव, श्री. जयदीप पाटील, श्री. धुळाजी करपे, श्री. सुशल देसाई, श्री. भाऊ हडकर, श्री. मनोहर शहा, श्री. प्रसाद कावले, श्री. वसंत देसाई संपर्क- श्री. बाबू कदम ९४२१५७४७००, रविवार ११ रोजी रात्री समर्थनगर वरचीवाडी पुरस्कृत खानोलकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला- यांचा संयुक्त दशावतार अनैतिक जन्म, सोमवार १२ रोजी रात्री ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी पुरस्कृत कार्यक्रम, मंगळवार रोजी रात्री चावल मुजावर प्रायोजित खुली जोडी नृत्य स्पर्धा, गुरुवार १५ रोजी रात्री व्यापारी संघटना आचरा आणि वैभवशाली पतसंस्था मर्यादित आचरा पुरस्कृत सुश्राव्य कीर्तन, शुक्रवार रोजी रात्री वाडोळी ग्रामस्थ मंडळ आचरा- भंडारवाडी पुरस्कृत लोकराजा ट्रीकसिन ग्रुप नेरूर यांचा एकपदा अर्थात पृथ्वीकंकण- ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्यप्रयोग, शनिवार १७ रोजी रात्री श्री गजानन उर्फ गजू गावकर पुरस्कृत खुली एकेरी नृत्म स्पर्धा, गुरुवार २२ ऑक्टोंबर २०२६ श्री सत्यनारायण महापूजा होणार असून या निमित्ताने आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री. संदिप पुजारे (महाडेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाडण, देवगड)पखवाज- कु. संकेत राऊत विरुद्ध बुवा गौरव पांचाळ (भजन मंडळ फुणगूस कडेवठार, संगमेश्वर)पखवाज- वैभव पांचाळ यांच्यात रंगणार आहे, शुक्रवार २३ रोजी रात्री वाजता देऊळवाडी मित्रमंडळ पुरस्कृत मंगळागौर भव्य खुली महिला फुगडी स्पर्धा’, शनिवार २४ ऑक्टोंबर २०२६ रोजी रामेश्वर मंदिर ते आचरा समुद्र किनारा अशी मिरवणूक निघून गणेश विसर्जन होणार आहे. गणेश उत्सवातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानंच्या वतीने अध्यक्ष प्रदिप प्रभूमिराशी व सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.












