आचरा- अर्जुन बापर्डेकर
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून आचरा ग्रामपंचायत व पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालवण पांडुरंग सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
यावेळी त्यांच्या सोबत यावेळी कनिष्ठ प्रशासक अधिकारी शैलेंद्र खडकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, पोलीस निरीक्षक श्री. संजय कातिवले (आचरा), वैद्यकीय अधिकारी डॉ. जुवेरीया मुजावर, ग्रामपंचायत अधिकारी युवराज चव्हाण, कृषी सेवक आर. एस. डाकोरे, मुख्याध्यापक सुभाष नाटेकर (पिरावाडी), मुख्याध्यापक सिद्धेश हळवे (आचरा), गटसमन्वय मनीष सावंत (पं. स. मालवण), ग्रामपंचायत सदस्या पुर्वा तारी,पोलीस पाटील तन्वी जोशी , जगन्नाथ जोशी आरोग्य कर्मचारी संदीप परब यांच्यासह आचरा प्रभागातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक-सेविका, आशा वर्कर्स, कृषी सहाय्यक, शिक्षक वर्ग, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा, घनकचरा, ओला व सुका कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले व त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
या स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत आचरा चे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.












