रत्नागिरी प्रतिनिधी
शेतात साप चावल्यामुळे कोल्हापूर येथे उपचार घेणाऱ्या वृध्देचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा.सुमारास सी.पी.आर रुग्णालयात घडली.
अनिता अनंत उभारे (60,रा.धोपटवाडी गोळप,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. त्या 15 ऑगस्ट 2026 रोजी गोळप येथीला शेतात काम करत असताना त्यांना सकाळी 9 वा.सुमारास साप चावला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना 15 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. हा आकस्मिक मृत्यू राजारामपूरी पोलिस ठाणे कोल्हापूर येथे दाखल होउन झिरो नंबरने पूर्णगड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.











