सावंतवाडीत गुरुवारी भव्य मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन….

आयुष्मान भारत’ कार्ड मोफत काढून मिळणार; लाभ घेण्याचे आयोजकांकडून आवाहन..

सावंतवाडी । प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी पोलीस, सावंतवाडी डॉक्टर फॅटर्निटी क्लब आणि औदुंबर स्वामी मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित रुग्णांना मोफत औषधाचे वाटप करण्यात येणार आहे

हे शिबिर गुरुवार, २४ रोजी पोलीस लाईन समोरील श्री औदुंबर स्वामी मंदिरात पार पडणार आहे.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. शिबिरामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत चितारी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांच्यासह विविध वैद्यकीय शाखांमधील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी व योग्य मार्गदर्शन करणार आहेत.

या आरोग्य शिबिराचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित पात्र नागरिकांना यावेळी पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून मोफत ‘आयुष्मान भारत’ कार्ड काढून दिली जाणार आहेत. याशिवाय याच ठिकाणी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, तसेच रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.