पेवेकोंड खालचीवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश

मंडणगड :  तालुक्यातील पेवेकोंड खालचीवाडी येथील ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पेवेकोंड येथे 17 सप्टेंबर रोजी विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तालुक्याच्या विकासासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमात यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, सदस्या दीप्ती घडशी, शिवसेना तालुका संघटक अनंत लाखण, उद्योजक संदेश चिले, मुंबई संपर्कप्रमुख शंकर बांद्रे, उपतालुकाप्रमुख रामदास रेवाळे, तुकाराम गायकवाड, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूणकर, नगरसेवक सुभाष सापटे, अजय शिगवण, विराज गायकवाड, रुपेश दुर्गवले, मनेष बाईत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.