वेंगुर्ले गाडीअड्डा आणि पोलिस स्टेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन घेतले गणरायाचे दर्शन

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन “वेंगुर्ले चा राजा” गणरायाचे दर्शन घेतले. तसेच वेंगुर्ले पोलीस स्टेशन येथील सार्वजनिक गणपतीचेही दर्शन घेतले.

गाडीअड्डा येथे गेली ३३ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित म्हापणकर व जनार्दन पडवळ यांनी मंत्री नितेश राणे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला. मंत्री नितेश राणे यांनी गणपतीची आरती करून दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ले चे नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुका अध्यक्ष पप्पू परब, सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, संदेश निकम, तातोबा पालयेकर, दाजी परब, सचिन शेट्ये, नगरसेविका लीना म्हापणकर, रीया केरकर, शितल आंगचेकर, गौरी मराठे, गौरी माइनकर, सुषमा प्रभूखानोलकर, काजल कुबल तसेच भूषण आंगचेकर, हितेश धुरी, वसंत तांडेल, गाडीअड्डा मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

दरम्यान यानंतर मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी मंत्री राणे यांचे स्वागत केले. या ठिकाणी मंत्री नितेश राणे यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पदाधिकारी आणि पोलीस बांधव उपस्थित होते.