आसगे मांडवकरवाडी येथील घटना, आकस्मिक मृत्यूची नोंद
लांजा (प्रतिनिधी) :दारूच्या नशेत विहिरीत पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आसगे मांडवकरवाडी येथे रविवारी रात्री घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची खबर योगेश गणेश दाभोळकर (वय ३२ वर्षे, रा.आसगे मांडवकरवाडी,ता.लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या
गणेश लक्ष्मण दाभोळकर (वय ५८ वर्षे, रा.आसगे मांडवकरवाडी) यांना दारूचे व्यसन होते. यातूनच रविवार दिनांक २० सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास ते दारूच्या नशेत आसगे येथील विहिरीत पडले होते .कुटुंबीयांच्या हि बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने लांजा
ग्रामिण रुग्णालयात आणले असता ग्रामिण रुग्णालय लांजा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासुन त्यास मयत घोषित केले .
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करीत आहेत.











