कणकवली :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे विभागीय केंद्र कोल्हापूर व अभ्यासकेंद्र: कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा विभागीय युवक महोत्सव रविवार दि.२७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनंत नागवेकर (चेअरमन शि.प्र.मंडळ कणकवली), उद्घाटक डॉ. एस.पी. थोरात (वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार विभागीय केंद्र कोल्हापूर), प्रमुख पाहुणे विजयकुमार वळंजू (सचिव शि. प्र. मंडळ कणकवली), केंद्रप्रमुख प्र. प्रा. युवराज महालिंगे (शि.प्र.मंडळ कणकवली), केंद्रसंयोजक प्रा. मनोज कांबळे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. हरिभाऊ भिसे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवामध्ये संगीत, नृत्य, अभिनय, ललितकला व वाडःमय प्रकार, मुर्तीकला, फोटोग्राफी इ. २८ कलाप्रकारांचा समावेश केला जाणार आहे. या विभागीय महोत्सवातून निवडल्या जाणाऱ्या कलाकारांना नाशिक येथे होणाऱ्या केंद्रीय महोत्सवामध्ये सहभाग मिळणार आहे व पुढे इंद्रधनुष्यसारख्या विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील अभ्यासकेंद्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी (वय वर्ष २५च्या आतील) या महोत्सवात सहभाग घेवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख प्र.प्राचार्य युवराज महालिंगे व केद्रसंयोजक मनोज कांबळे व सांस्कृतिक समन्वयक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे आणि संस्था पदाधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :- प्रा.एम.जे. कांबळे ९४०४७४४१६१, प्रा. हरिभाऊ भिसे-८४३२५४७६६७, सहाय्यक वैभव राणे ९४२०६९७९७३.










