मसुरे | प्रतिनिधी
मसुरे देऊळवाडा येथील रहिवाशी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद उर्फ आबा सोनू बागवे यांचे नुकतेच वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. गावातील धार्मिक कार्यक्रमात त्यांच्या सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, एक जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परीवार आहे. मसुरे देऊळवाडा येथील सिव्हिल इंजिनिअर उदय बागवे, सामाजिक कार्यकर्ते सोनोपंत बागवे यांचे ते वडील होत.










