श्री देव केळोबा प्रासा. भजन मंडळाच्या चमूला मोठी मागणी भजनाचे ग्लोबल रूप सर्वांना भावले
फोंडाघाट : (कुमार नाडकर्णी)
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गातील पेठा आणि वाड्या भजनाच्या सुरावटीने आणि फुगड्या -लोकगीतांच्या चैतन्याने गजबजून गेल्या.त्यामध्ये श्री सत्यनारायण पूजांनी चाकरमानी- पुरुष- महिलांची, युवाई ची लगबग लक्षणीय होती. पंचक्रोशीतील आणि बाहेरील भजन मंडळाच्या सुपार्या, चढाओढीने आणि आकर्षक भजन सुरांनी वाजत होत्या. त्यातून श्रद्धा,
भक्तीभाव आणि कर्तव्यपूर्ती चे दर्शन विलोभनीय आणि आनंददायी होते….
आज पंचक्रोशीत आपल्यानी सुमधुर सुरांनी आणि लोकप्रिय अभंग गायनाला , ग्लोबल रूप देऊन,पारंपारिक भजनाने लोकप्रिय ठरलेल्या “श्री देव केळोबा प्रासादिक भजन मंडळ, झरयेवाडी- फोंडाघाट” चा बोलबाला असून भजनप्रेमी व रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. आकर्षक आणि मनमोहक ड्रेसकोड आणि शिस्तबद्ध नियोजन वेळेचे भान ठेवून, भजनातील सर्व प्रकार व पारंपारिक विषय घेऊन केलेल्या भजन- गजरातून यजमान आणि रसिक मंत्रमुग्ध होतात. आणि बाप्पाचे परमसुख आणि आशीर्वादाची अनुभूती मिळते.अर्थात आजच्या धकाधकीच्या जीवनात ऊर्जा प्राप्त करणारा हा क्षण आणि केळोबा भजन मंडळाचे योगदान अनुभव सिद्ध ठरतो….












