दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमार व तलावांची पाहणी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा दौरा

 

 

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेशजी राणे हे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

 

या दौऱ्यादरम्यान मंत्री श्री. नितेश राणे हे सकाळी १० वाजता कन्नड तालुक्यातील शिवणटाकळी तलावाची पाहणी करून स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधणार आहेत.

 

त्यानंतर दुपारी १२.३० वाजता जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाची पाहणी करणार आहेत. तसेच दुपारी १.१५ वाजता सोमाठणा तलावाची पाहणी करून मच्छीमारांशी चर्चा करणार आहेत.

 

दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मत्स्यव्यवसायाशी संबंधित परिस्थिती तसेच नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यात येणार आहे.