चांद्रयान – 3 चे यश द्वीगुणीत करण्यासाठी “विक्रम ठेव योजना”

रत्नागिरी : इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाला स्वरूपानंद पतसंस्था सलाम करते. चांद्रयान – 3 उपक्रम यशस्वी झाला. सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा, आनंदाचा हा क्षण आपण अनुभवला. शास्त्रज्ञांनी केलेली ही कमाल भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी उंची देणारी आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कर्तुत्वाला सलाम आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्था या यशदायी क्षणामध्ये सगळ्याना सहभागी करून हा प्रसंग मेमोरेबल करू इच्छिते. त्यासाठी दिनांक २४ ते ३० ऑगस्ट या कालावधीसाठी एक विशेष ठेव योजना घोषित करत आहोत. ” विक्रम ठेव योजना ” हि योजना १३ महिने कालावधीसाठी असून ९% व्याजदर असेल. किमान १ लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल अशी “विक्रम ठेव योजना” चांद्रयान – 3 च्या यशाचा आनंद द्वीगुणीत करण्यासाठी घोषित करताना खूप आनंद होतो.

या यशस्वी उपक्रमाच्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी हि आकर्षक व्याजदराची विक्रम ठेव योजना घोषित केली आहे. केवळ ६ दिवस ही योजना सुरू असेल. गुंतवणूकदारांनी विक्रम ठेव योजनेत विक्रमी गुंतवणूक करून आकर्षक व्याजदराचा लाभ घेताना चांद्रयान – 3 च्या यशस्वी लँडिंगच्या स्मृती सदैव जागृत ठेवाव्यात असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे. या विक्रम योजनेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या १७ शाखांच्या परिसरात असणाऱ्या १७ विद्यालयांना प्रयोगशाळेसाठी काही साहित्य प्रदान करण्याचा उपक्रम दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी राबवण्यात येणार आहे. प्रयोगशीलता जोपासण्याचा संस्कार अधिक प्रबळ करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था हा उपक्रम राबवणार आहे अशी माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली