मंडणगड प्रतिनिधी : तालुक्यातील पाचरळ धनगरवाडी येथील युवक जतीन झोरे यांच्या दुग्ध व्यवसायाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी २८ सप्टेंबर २०२६ रेजी भेट देऊन व्यवसायाची पाहणी केली. ही भेट ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत करण्यात आली. यावेळी श्री देवळेकर यांनी दुग्ध व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी आवश्यक बाबींवर जतीन झोरे यांच्याशी चर्चा केली. तसेच पशुपालन व दुग्ध व्यवसायाशी संबंधित शासनाच्या विविध योजना, अनुदान व उपलब्ध सुविधांची माहिती देत व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील युवकांनी पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत दुग्ध व्यवसायातून स्वावलंबन व आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन अभिजीत देवळेकर यांनी यावेळी केले. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.











