युवराज लखमराजे भोंसले यांची  संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड

 

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सत्कार 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे व श्रमिक विद्यार्थी ज्ञान सेवा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांची

संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी अभिनंदनीय निवड झालेली आहे.

गेली अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल या निवडीमुळे घेतली गेलेली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी ते उत्तम काम करीत आहेत.त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुने व युजी ते पिजी पर्यंतचे विविध अभ्यासक्रम राबवणारे मुंबई विद्यापीठाचे बेस्ट कॉलेज तसेच नॅक ‘ए ‘ श्रेणी प्राप्त असलेले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय, त्याचबरोबर लीड कॉलेज दर्जा प्राप्त केलेले श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. तसेच कला, वाणिज्य,विज्ञान बरोबरच आय टी,सी एस, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता असे विविध अभ्यासक्रम यशस्वीपण राबवून महाविद्यालयाला

बदललेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अद्ययावत ठेवणे यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिलेले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत,संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अनुजा साळगावकर, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे सदस्य उपस्थित होते.