वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. क्र. ५२/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) व ३(५) अन्वये दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी पोलिसांच्या शोधात असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे. कुणाला या दोघांबाबत काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन वेंगुर्लेचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले आहे.
वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील बुराराम बागरी आणि मुकेश कुमार बागरी हे दोन्ही आरोपी सध्या पोलिसांना शोधून मिळून आलेले नसून, त्यांच्या शोधाची कार्यवाही सुरू आहे.
सदर दोन्ही आरोपींबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास ती तत्काळ वेंगुर्ले पोलिस ठाण्याशी संपर्क साधून द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी जाहीर केले आहे. तरी माहिती असल्यास या गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर तसेच वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निसर्ग ओतारी यांच्याशी संपर्क साधावा.












