कुडाळ । प्रतिनिधी : पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आनंद शांताराम सावंत (वय 69) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मुळ गाव वसोली पण ते गेली काही वर्षे झाराप येथे स्थायिक झाले होते.
तिलारी आणि टाळंबा पाटबंधारे प्रकल्पात त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले. त्यांचे गोवा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सुन असा परिवार आहे. दैनिक सकाळचे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख शिवप्रसाद देसाई यांचे ते मामा होत.
दरम्यान, आनंद सावंत यांच्या पार्थिवावर झाराप येथे आज बुधवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.












