मुंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्वच्छता मोहीम संपन्न

मंडणगड (प्रतिनिधी) :सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये प्रभारी प्राचार्य वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ.संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक-स्वयंसेविका सहभागी झाले होते. यावेळी डॉ. संदीप निर्वाण यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्व थोडक्यात सांगितले. यानंतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ.संगीता घाडगे व एन. एस. एस. प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. शेवटी डॉ. महेश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.