मंडणगड (प्रतिनिधी): इंडियन सोसायटी फॉर द स्टडी ऑफ मेटल टॉक्सिकॉलॉजी अँड चिलेशन थेरपी (ISSMTCT) या संस्थेच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत तालुक्यातील म्हाप्रळ सेथील डॉ. उल्हास इंबे यांची जॉइंट सेक्रेटरीपदी, निवड झाली आहे. या निवडीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे. मेटल टॉक्सिकॉलॉजी आणि चिलेशन थेरपी या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विषयांवर कार्यरत असलेल्या या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय ज्ञान, संशोधन आणि उपचारपद्धतींच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. डॉ. उल्हास इंबे यांच्या निवडीबद्दल मंडणगड तालुका डॉक्टर असोसिएशनतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मंडणगड तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.













