देवरूख (प्रतिनिधी):
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रिडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 10 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,राजापूर येथे 14,17,19 वयोगटामध्ये राज्य क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा,उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, स्पर्धा आयोजक राजापूर तालुका अध्यक्ष अभिजीत तेली व सर्व तालुका पदाधिकारी मुकेश नाचरे,सचिव लक्ष्मण कररा, पंच प्रमुख भरत कररा,यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर, चिपळूण, खेड, रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोली, गुहागर तालुक्यातून सुवर्ण पदक पटकावलेले खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंची निवड विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे यामध्ये संगमेश्वरच्या तायक्वांदो पट्टूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत 9 सुवर्णपदक ,9 रौप्य पदक व 5 कांस्य पदक पटकावून तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला. या सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंची निवड दिनांक 01 ते 03 ऑक्टोबर 2026 रोजी
रेणुका हॉल, वाठार
तळसंदे रोड , तळसंदे
ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे,
पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे
मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली –
14 वर्षा खालील मुली :-
1. दुर्गा मोघे – कांस्य पदक 🥉
2. सांची मुंडेकर – सहभाग
14 वर्षा खालील मुले
1. आर्य भोसले – सहभाग
2. सोमांश सावंत – सहभाग
17 वर्षा खालील मुली :-
1. सिया सागवेकर – सुवर्ण पदक 🥇
17 वर्षा खालील मुले
1. आदित्य चिपळूणकर – सुवर्ण पदक 🥇
19 वर्षा खालील मुली
1. भुमिका शिंदे – सुवर्ण पदक 🥇
2. समृद्धी घडशी – कांस्य पदक 🥉
अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूल देवरुख –
14 वर्षा खालील मुली :-
1. रितिशा कांगणे – सुवर्ण पदक 🥇
14 वर्षा खालील मुलं :-
1. अधिराज कदम – सुवर्ण पदक 🥇
2. वेदांत मसुरकर – कांस्य पदक 🥉
17 वर्षा खालील मुलं :-
1. यशराज कटके – सुवर्ण पदक 🥇
2. साहिल जागुष्टे – कांस्य पदक 🥉
3. शौर्य लोध – सहभाग
आश्रम शाळा निवे बु –
14 वर्षा खालील मुली :-
1. भक्ती गुरव – रौप्य पदक 🥈
2. स्वरा धोपावकर – कांस्य पदक 🥉
17 वर्षा खालील मुली :-
1. सान्वी रसाळ – रौप्य पदक 🥈
17 वर्षा खालील मुलं :-
1. आर्यन यादव – रौप्य पदक 🥈
2. ऋतिक रसाळ – रौप्य पदक 🥈
3. युवराज केतकर – सहभाग
19 वर्षा खालील मुली :-
1. सान्वी जाधव – रौप्य पदक 🥈
लोक विद्यालय तुळसणी –
17 वर्षा खालील मुली :-
1. श्रावणी ईप्ते – सुवर्ण पदक 🥇
2. मृणल जाधव – सहभाग
ताम्हणे हायस्कूल –
14 वर्षा खालील मुलं :-
1. प्रभात रहाटे – सहभाग
17 वर्षा खालील मुली :-
1. पुर्वा रहाटे – सहभाग
न्यू इंग्लिश स्कूल देवरुख –
14 वर्षा खालील मुलं :-
1. अफजान फुलारी – सुवर्ण पदक 🥇
*19 वर्षा खालील मुली :-
1. सान्वी जागुष्टे – रौप्य पदक 🥈
2. सेजल बावधने – रौप्य पदक 🥈
पैसाफंड हायस्कूल संगमेश्वर –
14 वर्षा खालील मुलं :-
1. पियुष रहाटे – रौप्य पदक 🥈
17 वर्षा खालील मुलं :-
1. प्रथमेश शेट्ये – रौप्य पदक 🥈
न्यू इंग्लिश स्कूल कसबा –
17 वर्षा खालील मुलं :-
1. सोहम चव्हाण – सुवर्ण पदक 🥇
दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी –
17 वर्षा खालील मुली :-
1. श्रेया मोरे – सहभाग
या यशस्वी तायक्वांदो पट्टुंनचा छोटेखानी सत्कार समारंभ नगरपंचायत देवरुख ताईक्वांडो क्लब या ठिकणी संपन झाला त्या वेळी अध्यक्षा तालुका अकॅडमीच्या उपाध्यक्षा सौ.स्मिता लाड, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्त्ये, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे,क्लब सदस्या रुपाली कदम,स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे,सुमीत पवार, मयुरी राऊत, करण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम,माजी राज्यमंत्री रविंद्र माने, जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, देवरुख गावच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार,नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ पुनम चव्हाण, तालुका अकॅडमी उपाध्यक्ष परेश खातू खजिनदार चिन्मय साने क्लब सदस्या स्वाती नारकर, पालक प्रतिनिधी आदिती लोध,सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, सानिका प्रसादे,संकेत मापुस्कर,पंकज मेस्त्री, सुशांत मेस्त्री,सिद्धी केदारी,वेदांत गिड्ये, गायत्री शिंदे, व सर्व नगरसेवक आदींनी अभिनंदन केले.












