राजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात भाजपाकडून संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देण्यात येत असून, गावागावांत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तालुक्यातील कोंडसर खुर्द येथील शेडेकरवाडीतील प्रमुख ग्रामस्थांसह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे कोंडसर खुर्द परिसरातील भाजपाचे संघटन अधिक मजबूत झाले आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात संघटनात्मक कामकाजाला गती देण्यात येत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. तसेच राजापूर तालुक्यातील स्थानिक प्रश्न, गावपातळीवरील विकासकामांचा पाठपुरावा आणि स्थानिक नेतृत्वाची गरज या मुद्द्यांना प्राधान्य देत अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गावागावांत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न जाणून घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले
शेडेकरवाडीतील प्रमुख ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये आकांक्षा हेमंत शेडेकर, हेमंत गणपत शेडेकर, प्रकाश गोविंद शेडेकर, कोमल प्रकाश शेडेकर, सावित्री गोविंद शेडेकर. समीर सूर्यकांत शेडेकर, शंकर कृष्णा तळये, महेश कृष्णा तळये, साईनाथ राजाराम वारीक, प्रवीण पांडुरंग शेडकर, महेश महादेव दळवे, केशव विष्णू पड्यार,मनोज मधुकर शेडेकर, स्वप्नील भिकाजी शेडेकर,सदानंद तुकाराम शेडेकर,संतोष बाळू शेडेकर. शांताराम सदू शेडेकर, किरण पांडुरंग कोबळी, अनंत गोवाळ शेडेकर, अनंत बाळू शेडेकर, संजना संतोष शेडेकर,सुशिला शिवा शेडेकर. वैशाली विलास शेडेकर, राजाराम गोविंद पड्यार,मनिषा मधुकर शेडेकर, कार्तिकी केशव पड्यार, आर्या स्वप्नील शेडेकर यांचा समावेश आहे. अभिजित गुरव यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपा मंडल अध्यक्ष मोहन घुमे, ओबीसी अध्यक्ष संदीप तेरवणकर, ज्येष्ठ नेते बाळ दाते, भाई फणसे, वरद गोरे, संतोष नांदगावकर, मनीष नांदगावकर, संजय पड्यार, संदेश भोसले आणि घनश्याम तळये यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व ग्रामस्थांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शेडेकरवाडीतील या पक्षप्रवेशामुळे कोंडसर खुर्द परिसरातील पक्ष संघटनेला बळ मिळाल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.












