नाडणसह सात गावांतील भातशेती नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमानुसार मदत मिळण्यासाठी सभापती गणेश राणे यांची तातडीने कार्यवाहीच्या सूचना

देवगड तालुक्यातील नाडण, मळेगाव, मोंडपार, बापर्डे, वाणिवडे, पावणाई व रहाटेश्वर परिसरातील भातशेतीचे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीम. सुयोगी घाडी,श्रीम. अवनी तेली, पंचायत समिती सदस्या श्रीम. संजना लाड, नाडणचे माजी सरपंच संतोष कानडे, नाडण प्रशासक धुरे, मळेगाव सरपंच, मोंड सरपंच, वाणिवडे सरपंच, बापर्डे सरपंच संजय लाड, पावणाईचे उपसरपंच नरेश लाड आदी उपस्थित होते.

कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, कृषी अधिकारी मानसी पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी दिगंबर खराडे, सहाय्यक कृषी अधिकारी संभाजी जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी साळोखे, रणजितसिंह ढाळे, कृष्णा धुरी तसेच नाडण ग्रामपंचायत अधिकारी अंकित धूमाळ, मळेगाव ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण घरजाळे, मोंड ग्रामपंचायत अधिकारी राधिका आचरेकर, बापर्डे व वाणिवडे ग्रामपंचायत अधिकारी विजय घुणावत आदी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान संबंधित गावांतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून भातशेतीच्या नुकसानीची माहिती घेण्यात आली. नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे तसेच आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.