शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी व फार्मर आयडी तातडीने पूर्ण करावा

तहसील कार्यालय मंडणगडचे आवाहन; शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रक्रिया आवश्यक

मंडणगड, प्रतिनिधी  : शासनाने ‘ट्रिगर-१’ जाहीर केले असून, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी (e-Peek Pahani) व फार्मर आयडी (Farmer ID) तयार असणे आवश्यक असल्याची सूचना तहसील कार्यालय मंडणगडच्या वतीने करण्यात आली आहे.
यामुळे मंडणगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतजमिनीची ई-पिक पाहणी तसेच फार्मर आयडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळविताना ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडीला महत्त्व असून, संबंधित प्रक्रिया पूर्ण नसल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येऊ शकतात, असे तहसील कार्यालयाच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता ई-पिक पाहणी व फार्मर आयडी पूर्ण करून घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, मंडणगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.