रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील गावडे-आंबेरे येथून 21 वर्षीय तरुणीचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा.सुमारास घडली.
सानिया दामोदर नाटेकर (21,रा.गावडे-आंबेरे-हनुमानवाडी,रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तरुणीची आई दामिनी दामोदर नाटेकर (45,रा.गावडे-आंबेरे,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी त्यांची मुलगी सानिया नाटेकर हीने रत्नागिरीत जाउन मोबाईलचा डिस्प्ले बदलून येते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. परंतू सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्यामुळे तिच्या आईने इतर नातेवाईक आणि तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी करुन अखेर बुधवार 30 सप्टेंबर रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.










