जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्गात इयत्ता ९ वी व ११ वीच्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या रिक्त जागांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय समिती, नोएडा यांच्यामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 

इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_9 तर इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्रवेशासंदर्भातील आवश्यक माहितीही या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

प्रवेश अर्ज भरताना पालकांची सही, विद्यार्थ्याची सही आणि विद्यार्थ्याचा फोटो आवश्यक आहे. तसेच खुल्या प्रवर्गाव्यतिरिक्त इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संबंधित प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्राचे FROM No. 9 म्हणजेच Creamy Layer प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे विद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख पूर्वी ३० सप्टेंबर २०२६ होती. मात्र, आता ही मुदत वाढवून १५ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच परीक्षा प्रमुख हेमंतकुमार जोंधळे आणि एस. पी. हिरेमठ यांच्याशीही संपर्क साधता येणार असल्याचे विद्यालय प्रशासनाने कळविले आहे.