रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील मांडवी बिच येथे किरकोळ कारणातून मित्रालाच काठीने आणि हातांच्या थापटांनी मारहाण केली. ही घटना गुरुवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा.सुमारास घडली.
रोहन ठिक आणि सोहम पड्यार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयित मित्रांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात स्वरुप दोरखंडे (रा.फणसोप,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी स्वरुप दोखंडे हा मांडवी बिचवर रोहन ठिक आणि सोहम पड्यार या दोघांना भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्यांच्यात काही कारणातून वाद झाल्यानंतर या दोघांनी मिळून स्वरुप दोरखंडेला काठीने आणि हातांच्या थापटांनी बेदम मारहाण केली. यात जखमी झालेल्या स्वपला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












