राजापूर प्रतिनिधी : राजापूर नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी उपनगराध्यक्ष विनय गुरव यांसह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही महान नेत्यांच्या विचारांना अभिवादन करून त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले.
Home महत्वाच्या बातम्या राजापूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व व लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली













