अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड

खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांची निवड झाल्याने खेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या युवा संघटनात्मक बांधणीत तसेच युवकांना पक्षाच्या कार्याशी जोडण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांची भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल खेड शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रदेश पातळीवरील या जबाबदारीमुळे खेड परिसरातील युवा कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामासाठी नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजप अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, भाजप खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजप प्रेरित रिक्षा सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजप प्रेरित रिक्षा सेलचे खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजप रिक्षा युनिटचे उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे आदी उपस्थित होते.
तसेच भाजप खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, रविंद्र उर्फ बाबुशेठ नांदगांवकर, भाजप खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजप खेड शहराचे विजय गुप्ता, भाजप युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजप खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजप युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजप युवा मोर्चा खेड शहर कार्यकारिणी सदस्य रत्नदीप जाडकर, अहमद हमदुले, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अ‍ॅड. नांदगांवकर यांच्यावर सोपविण्यात आलेली प्रदेश सचिवपदाची जबाबदारी ही खेडसह रत्नागिरी जिल्ह्यातील युवा संघटनेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. प्रदेश पातळीवर काम करताना युवकांशी संवाद वाढविणे, संघटनात्मक उपक्रमांना चालना देणे आणि पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी ते भूमिका बजावतील, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
खेड परिसरातील कार्यकर्त्यांनी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे खेड तालुक्याला भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश संघटनेत प्रतिनिधित्व मिळाले असून, आगामी काळात युवा मोर्चाच्या माध्यमातून विविध संघटनात्मक व सामाजिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.