मनीष दळवी यांनी केले गवस कुटुंबियांचे सांत्वन 

दोडामार्ग | प्रतिनिधी 

शिवसेना शिंदे गटाचे दोडामार्ग तालुका संघटक, मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस यांच्या निधनाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी त्यांच्या घरी भेट देत नातेवाईकांचे सांत्वन केले.

 

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी अध्यक्ष सुधीर दळवी, शाबी तुळसकर आदी उपस्थित होते. कै. गोपाळ गवस यांचे

वडील, पत्नी, मुली यांचे मोर्ले येथील राहत्या घरी सांत्वन करून त्यांना धीर दिला.

 

यावेळी त्यांनी कै. गोपाळ गवस यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचे कौतुक केले. शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा त्यांनी उल्लेख केला. शिवसेना पक्षाने हाडाचा कार्यकर्ता गमावला अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.