BREAKING: देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील निवेखुर्द येथील निंबेरा पूलाचा कठडा तोडून डंपर थेट नदीत कोसळला

सुदैवाने चालक व क्लिनर बालंबाल बचावला

निलेश जाधव / देवरूख :

देवरूख ते कळकदरा या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे

सध्या आंगवली येथे हे काम सुरू आहे

या कामासाठी खडी भरलेला डंपर आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास देवरूखहून आंगवलीच्या दिशेने येत असताना ७.१५ वाजण्याच्या सुमारास निवेखुर्द येथील निंबेरा पुलाच्या पुढील चढावात डंपरचा एक्सल तुटला

यानंतर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर पाठीमागे येवून पुलाचा कठडा तोडत थेट नदीपात्रात कोसळला

डंपर नदीपात्रात कोसळल्याचे दिसताच या मार्गावरून येजा करणाऱ्या वाहनचालकांनी वाहने थांबवून डंपरचालक व क्लिनरला उपचारासाठी देवरूख येथे नेण्यात आले

घटनास्थळी वाहनचालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती