देवरूख (प्रतिनिधी):
मीनाताई ठाकरे हायस्कूल, साडवली येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये(१९ वर्षाखालील गटात) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त करून, प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. महाविद्यालयाच्यावतीने यशस्वी कामगिरी करणारे विद्यार्थी खेळाडू खालील प्रमाणे:-
थाळीफेक:
मुले- सार्थक प्रकाश आडसे -प्रथम
गोळाफेक:
मुले- सार्थक प्रकाश आडसे -प्रथम
मुली- अनुष्का महेश अंकुशराव- द्वितीय
१०० मी. धावणे:
मुली- ईश्वरी सचिन गुरव- द्वितीय
२०० मी. धावणे:
मुले- वेदांत योगेश गवंडी- द्वितीय
मुली- ईश्वरी सचिन गुरव-द्वितीय
४०० मी. धावणे:
मुली- सानिका संतोष सनगले- प्रथम
८०० मी. धावणे:
१. मुली- सानिका संतोष सनगले- प्रथम
२. अनुष्का अरुण अडबल- तृतीय
१५०० मी. धावणे:
मुले- देवदास नामदेव पोवार- प्रथम
लांब उडी:
मुली: अक्षरा संदेश कांबळे- द्वितीय
उंच उडी
मुली- अक्षरा संदेश कांबळे- तृतीय
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून स्वप्नाली झेपले यांनी जबाबदारी सांभाळली. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समिती अध्यक्षा सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना प्रमुख प्रा. विजय मुंडेकर, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनव पातेरे आणि प्रा.देवयानी जोशी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.













