जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या मुलींचा ऐतिहासिक विजय !

वेंगुर्ले : प्रतिनिधी

मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या संघाने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या मुलींनी प्रभावी गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यामुळे आता या संघाची विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुलींच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक श्री. डी. जी. शितोळे व जिमखाना चेअरमन श्री. विरेंद्र देसाई यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विजेत्या खेळाडूंना शिक्षण प्रसारक मंडळ ,कोल्हापूरचे सचिव प्रा. श्री. जयकुमार देसाई साहेब ,पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते श्री. दौलतराव देसाई साहेब, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी देसाई-मोरे मॅडम ,प्रशासन अधिकारी श्री .पृथ्वी मोरे,प्राचार्य, प्रो.डाॅ.डी.बी.गोस्वामी,संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद् चव्हाण, पर्यवेक्षक श्री. डी.जे.शितोळे जिमखाना चेअरमन श्री. विरेंद्र देसाई, क्रीडा शिक्षक श्री. वासुदेव गावडे व श्री. हेमंत गावडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.