गुहागर BREAKING : गुहागरचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांची रायगड येथे बदली …

गुहागर | प्रतिनिधी  : गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांची रायगड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. खेडकर यांच्या बदलीमुळे गुहागर पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी आता नव्या अधिकाऱ्याकडे जाणार आहे. प्रवीण रणदिवे यांची गुहागरचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रणदिवे लवकरच गुहागर पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. खेडकर यांनी गुहागर येथे कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या बदलीनंतर गुहागर पोलीस ठाण्याच्या कामकाजाची धुरा रणदिवे यांच्या हाती येणार आहे. नव्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीमुळे गुहागरमधील पोलीस प्रशासनात बदल होणार आहे. रणदिवे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.