श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे 15 रोजी भव्य ग्रंथ प्रदर्शन

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. या निमित्ताने कांदळगाव येथील ‘श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे १५ ऑक्टोबर रोजी भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ग्रंथ प्रदर्शन सकाळी ९:३० ते १२:०० आणि दुपारी २:३० ते ५:०० या वेळेत सर्वांसाठी उघडे राहील.

या प्रदर्शनात विविध प्रकारची उत्कृष्ट पुस्तके आणि ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वाचनाची आवड निर्माण व्हावी व ती जोपासली जावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथ प्रदर्शनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.