देवगडमधील प्रथितयश व्यापारी व ज्येष्ठ सुवर्णकार निलरत्न उर्फ बबन मालंडकर यांचे निधन

वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास; व्यापारी व सुवर्णकार बांधवांमध्ये शोककळा

देवगड : प्रतिनिधी

देवगडमधील प्रथितयश व्यापारी व ज्येष्ठ सुवर्णकार नीलरत्न उर्फ बबन मालंडकर यांचे आज मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांनी  अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने देवगडमधील व्यापारी आणि सुवर्णकार बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.

नीलरत्न उर्फ बबन मालंडकर हे देवगडमधील सुवर्णकार व्यवसायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते. देवगड दैवज्ञ समाजाचे खजिनदार म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाने व्यापारी व सुवर्णकार बांधवांनी हळहळ व्यक्त केली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.