लांजा आगरवाडी येथील तरुणावर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) : पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेला दुचाकी स्वराने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील गंभीर जखमी झालेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार
गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री रात्री ७ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर कुवे पुरागाव येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताबाबतची फिर्याद सुहास सखाराम भोवड (वय ३४, राहणार वनगुळे खालची वाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. सुहास भोवड यांचे सासरे मनोहर सिताराम गुरव (वय ५४, राहणार वनगुळे गुरववाडी) हे रविवारी रात्र सात वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील मेस्ट्रो ही दुचाकी (क्रमांक एम एच ०८- एसी-१८८९ ) घेऊन मुंबई गोवा महामार्गाने वनगुळे येथे चालले होते. कुवे पुरागाव या ठिकाणी आले असता पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वराने
त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही डीओ दुचाकी (क्रमांक एम एच ०८-ए एम-९२२७) प्रथमेश रमेश करंबेळे (वय २६, राहणार आगरवाडी लांजा) हा चालवीत होता.
या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मनोहर गुरव यांचे अपघातानंतर काही वेळातच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश करंबेळे याला देखील अधिक उपचार साठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघात प्रकरणी प्रथमेश करंबेळे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) २८१, मोटार वेहिकल ऍक्ट कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संजय मारळकर हे करीत आहेत.













