वेंगुर्ले : प्रतिनिधी
सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय पीप साइट १० मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या कु. गौरव दत्तप्रसाद आजगावकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशामुळे त्यांची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुरुवातीपासूनच अचूक निशाणा साधत त्यांनी आपले वर्चस्व राखले होते. कठोर शिस्त, सातत्यपूर्ण सराव, नेमबाजीचे कौशल्य आणि कमालीचा आत्मविश्वास दाखवत त्यांनी सर्वाधिक गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्यांच्या या यशस्वी खेळामागे त्यांचे नियमित सरावाचे आणि मार्गदर्शकांचे योगदान आहे. आता विभागीय पातळीवरही अशीच कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविण्याचे माझे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बी. गोस्वामी, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक श्री. डी. जे. शितोळे व जिमखाना चेअरमन श्री. विरेंद्र देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विजेत्या खेळाडूस शिक्षण प्रसारक मंडळ ,कोल्हापूरचे सचिव प्रा. श्री. जयकुमार देसाई साहेब, पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते श्री. दौलतराव देसाई साहेब ,चेअरमन प्रा.डॉ .मंजिरी देसाई-मोरे मॅडम, प्रशासन अधिकारी श्री .पृथ्वी मोरे प्राचार्य प्रो.डॉ. डी बी. गोस्वामी, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण ,पर्यवेक्षक श्री. डी .जे.शितोळे जिमखाना चेअरमन श्री. विरेंद्र देसाई, क्रीडा शिक्षक श्री. वासुदेव गावडे व श्री. हेमंत गावडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.













