शिरगाव येथे बुधवारी एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिर

अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी) :

देवगड तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या १४ ऑक्टोबर रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरगाव येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या सौजन्याने हे शिबिर बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शिरगाव बाजपेठ येथील मंदिरात होणार आहे. नागरिकांना डिजिटल व कॅशलेस प्रवासाची सुविधा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घेण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि २०० रुपये शुल्क सोबत आणणे आवश्यक आहे.

अमित साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.