पळसंब गावठणवाडी झरीचा व्हाळ येथे श्रमदानातून बंधारा उभारणी

मसुरे | झुंजार पेडणेकर :पळसंब गावठणवाडी तील महिलांनी एकत्र येत श्रमदानातून झरीचा व्हाळ (ओढा) येथे वनराई बंधारा उभारला. महिलांच्या एकजुटीचे, सामाजिक बांधिलकीचे आणि गावाच्या विकासासाठी असलेल्या सामूहिक प्रयत्नांचे दर्शन घडविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची पातळी टिकून राहावी, शेतीसाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी आणि परिसरातील भूजल पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेतला.

पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून ओढ्यातील पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत श्रमदान करून हा उपक्रम यशस्वी केला. गावाच्या भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या श्रमदान उपक्रमावेळी

अक्षता परब, पल्लवी सावंत ,अंगणवाडी सेविका निकिता पुजारे, मिनाक्षी सावंत, वैशाली परब, निकिता सावंत, पोलिस पाटिल पुनम गोलतकर, मिनल जुवेकर, सुनेत्रा परब, अमिता परब, जयश्री परब, रजना सावंत उपस्थित होत्या. सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी आभार मानले.