मंडणगड प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानाचे अंतर्गत तहसिल कार्यालय मंडणगड यांचेवतीने 13 ऑक्टोंबर 2026 रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या संसदीय कारकीर्दच्या पंचवीस वर्षांचे वर्षपुर्ती निमीत्त 17 सप्टेंबर 17 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत तालुक्यात महसुल कृषी आरोग्य व सर्व प्रशासकीय यंत्रणांचे माध्यमातून सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून विविध कार्यालयाचे जनकल्याण विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत विनासायास पोहचविण्याचे काम सर्वच यंत्रणा करताना दिसून येत आहेत. शिबाराचे प्रस्तावीक करताना तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी या अभियानात आरोग्य विभागाने 38 शिबीरे आयोजीत करुन 1242 नागरीकांना आरोग्य सेवा दिली, कृषि विभागाने 3800 महिला शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्र 70 कृषि शेतकऱ्यांना अवजारे, 190 शेतकऱ्यांना काजू कलमे, 61 शेतकऱ्याना पी.एम. किसान कार्ड उपलब्ध करुन दिल्याची माहीती दिली. महसुल विभागाने मंडळ स्तरावर सातबार फेराफर उत्पन्नाचे दाखले यांचे वाटप करण्यात आले याचबरोबर पाणंद रस्ते व लोकअदालतीचे माध्यमातून अनेक दावे मार्गी लावण्यात आलेले असल्याचे सांगीतले. पशुसंवर्धन विभागाने तुळशी लाटवण येथे दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजीत केल्याचे सांगीतले. या कार्यक्रमास सभापती प्रणाली चिले, जि.प. सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दिपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दिप्ती घडशी, तालुका कृषि अधिकारी सोमनाथ अहिरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी वामन मेंढे, उमेश म्हस्के, जे.बी.वाईकर, सुदर्शन खानविलकर, आर.बी. खंदारे, यांच्यासह सर्व यंत्रणाचे अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचीत्य साधून ग्रामिण गृहनिर्माण विभाग, पंचायत समिती दिव्यांग लाभार्थी अनुदान वाटप, एकात्मिक बालविकास विभागाचे माध्यमातून बेबी केअर किट, कृषि विभागाचेवतीने पॉवर विडर ब्रश कटर फवारण पंप यांचे वाटप, पशुसंवर्धन विभागाचे प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप, आरोग्य विभागाचेवतीने आयुष्यमान भारत कार्ड, नगरपंचायतीचेवतीने अससेमेंट दाखल्याचे वितरण करण्यात आले तर महसलु विभागाकडून विविध दाखल्याचे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचेहस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन गोवळकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.













