घोसाळे येथे बेकायदा देशी दारू जप्त; ७४ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या कारवाईत ११ दारूच्या बाटल्या जप्त

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील घोसाळे गावात देशी दारू विक्रीच्या उद्देशाने बेकायदा बाळगल्याप्रकरणी रामदास घोसाळकर वय ७४ यांचे विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ८८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ११ बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती उपलब्ध तक्रारीतून समोर आली आहे. या संदर्भात पोलिस स्थानकात दाखल माहितीनुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास घोसाळे गावातील एका घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हेड कॉनस्टेबल विशाल कोळथरकर यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.