तालुकास्तरीय खो-खो १४ वर्षे मुलींच्या संघाने पटकावले अंतिम विजेतेपद
संतोष कोत्रे
लांजा : लांजा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत
तळवडे च्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालयाच्या १४ वर्षे मुलींच्या संघाने खो खो मध्ये विजेतेपद पटकावत सलग दहा वर्षांची विजयाची परंपरा या वर्षी देखील कायम राखली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा तालुकास्तरीय १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धा श्रीराम विद्यालय वेरवली येथे संपन्न झाल्या. यामध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेच्या मुलींनी आज पर्यंतची विजयाची परंपरा कायम ठेवत सलग १० वर्षे तालुकास्तरीय १४ वर्षे मुलींच्या स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले.तर मुलांनी विजयाची परंपरा कायम ठेवत सलग ४ वर्षे तालुका स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले आहे.
दोन्ही गटाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी १ डाव ४ गुणांनी लांजा हायस्कूल संघाचा पराभव केला.मुलींच्या संघाची कर्णधार कु.आराध्या माने, पौर्णिमा दरडे,शितल गुरव,सिध्दी इंगळे, आर्या टोळे, आराध्या करंबेळे यांनी उत्कृष्ट संरक्षण केले. त्यांना कल्याणी कांबळे,सार्थकी पांचाळ, ज्ञानेश्वरी शिंदे,पूर्वी दरडे,तन्वी नामये,दिव्या नामये,युक्ता तापेकर,श्रावणी पाल्ये,सानिया इंगळे यांनी उत्तम साथ दिली.
मुलांच्या संघाचा कर्णधार आदित्य माटल,आयुष इंगळे ,चिराग पाटोळे,देवांत दरडे, आदित्य नामये, उमेश इंगळे यांनी उत्कृष्ट संरक्षण केले.त्यांना आर्यन इंगळे,पार्थ आगरे,राज कांबळे,यश जाधव, आर्यन माने, प्रज्वल सुतार,संभव दरडे, साईराज मोहिते,रितिक घाणेकर यांनी साथ दिली.खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे,विजय पाटोळे, सुशील वासुरकर,चेतन सनगले,दिपक धावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडू व मार्गदर्शक यांचे तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी पदाधिकारी,शाळा समिती पदाधिकारी,सभापती, सरपंच, उपसरपंच,पालक, ग्रामस्थ,माजी विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.













