मंत्री योगेश कदम, रामदास कदम व समाजसेविका श्रेया कदम यांची प्रमुख उपस्थिती
मंडणगड (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या वतीने युवा सेना जेन जी दांडिया आणि डीजे नाईट या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेश शिवसेना नेते रामदास कदम तसेच समाजसेविका सौ. श्रेया योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यंदा प्रथमच शिवसेना युवा सेनेच्या वतीने मंडणगडमध्ये दांडिया आणि डीजे नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रनास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना व सर्व कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव युवासेना तालुकाप्रमुख विकास पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. कार्यक्रमात दांडिया नृत्य आणि डीजे संगीताची विशेष मेजवानी अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, अधिक माहितीसाठी ऋुतिक चिले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













