श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थानात १५ ऑक्टोबरला ‘डबलबारी भजनांचा जंगी सामना

​मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या नवरात्र उत्सव २०२६ निमित्त पळसंब येथे भव्य ‘डबलबारी भजनांच्या जंगी सामन्याचे’ आयोजन १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता श्री जयंतीदेवी मंदिर येथे करण्यात आले आहे .
​
​श्री गांगेश्वर सादिक भजन मंडळ, रामगड देऊळवाडी:
​बुवा: श्री. राजेंद्र घाडीगावकर
(​गुरुवर्य: कै. मंगेश घाडीगावकर, कै. काशिराम परब आणि बुवा श्री. गणेश पांचाळ )
​पखवाजा: मनीष घाडीगावकर ,
​तबला: रामचंद्र (ताता) मेस्त्री विरुद्ध
​आई मोराई सादिक भजन मंडळ, बोर्डवे-कणकवली
​बुवा: श्री. मकरंद मोडक
(​गुरुवर्य: संदीप लोके )
​पखवाजा: मनिष निकम
​तबला: शुभम कावले या दोहोंच्यात हा सामना होणार आहे.
​हा कार्यक्रम उद्योगपती श्री. जितेंद्र जोशी (मुंबई) आणि श्री. बाळा चिंदरकर (मुंबई) यांनी पुरस्कृत केला आहे.
​या भक्तिमय भजन सामन्याचे आयोजन श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पळसंब यांनी केले असून, परिसरातील सर्व भक्तांनी व भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.