मंडणगड प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मंडणगड येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. १४ वर्षांखालील मुलगे व मुली, १७ वर्षांखालील मुलगे १९ वर्षांखालील मुलगे व मुली यांनी आपल्या गटांत प्रथम क्रमांक मिळवला, तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल झाले असून तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडाप्रमुख संजय अवेरे आणि गौतम माने यांच्या अथक प्रयत्नांतून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले.या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थी व संघांचे अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. फोटो ओळी -यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करताना प्रशालेतील शिक्षक













