कुवे नं. २ शाळेतील विद्यार्थ्यांचे लांजा तहसील कार्यालय येथे स्त्री सशक्तीकरण विषयावर पथनाट्य सादर

लांजा (प्रतिनिधी): स्त्री सशक्तीकरण या विषयावर
कुवे नं. २ शाळेतील विद्यार्थ्यांच्या पथनाट्याचा कार्यक्रम मंगळवारी लांजा तहसील कार्यालय येथे पार पडला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत भांबेड प्रभागातील कुवे केंद्रातील कुवे नं. २ या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री सशक्तीकरण या महत्त्वपूर्ण विषयावर आत्मविश्वासाने पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने स्त्री सशक्तीकरणाचा मोलाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. विद्यार्थीनी शाळेचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जे पथनाट्य सादरीकरण केले त्याने कुवे केंद्राची यशोगाथा उंचावली.
या कार्यक्रमा प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर, केंद्र प्रमुख कुवे विलास गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच
कुवे नंबर २ शाळेच्या मुख्याध्यापक सौ.जागृती गुरव सौ.प्रज्ञा कांबळे सौ.वर्षा शेंडगे आदी उपस्थित होते.