पोलीस पाटील दर्शना सावंत यांच्या प्रयत्नांना यश
लांजा (प्रतिनिधी) : ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि पोलीस पाटील दर्शना सावंत, सर्वेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नामुळे लांजा शिरंबवली पाली ही बसफेरी सुरू करण्यात आली असून त्या बसफेरी चा शुभारंभ नुकताच आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यापूर्वी लांजा बसस्थानकातून सकाळी ७.३० वाजता लांजा पाली–शिरंबवली–लांजा ही बस फेरी सुरू होते. मात्र शालेय विद्यार्थी आणि अनेक ग्रामस्थांसाठी ही बस फेरीची वेळअत्यंत गैरसोयीची ठरत होती. एवढ्या सकाळी घरातील सर्व कामे आटोपून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच शासकीय कामासाठी लांजाला जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या मार्गावर सकाळच्या या एका एस.टी. व्यतिरिक्त ग्रामस्थांसाठी दुसरी कोणतीही सोयीची बस उपलब्ध नसल्याने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे त्यांना आर्थिक भारही सहन करावा लागत होता. त्यामुळे पोलीस पाटील दर्शना सावंत यांनी आमदार किरण सामंत तसेच एसटी डेपो मॅनेजर प्रकाश झोरे यांना निवेदन देऊन विद्यार्थी प्रवाशांच्या सोयीसाठी लांजा बस स्थानकातून सकाळी सुमारे ९.३० वाजता पाली–शिरंबवली–लांजा अशी आणखी एक एस.टी. फेरी सुरू करावी अशी मागणी केली होती.
पोलीस पाटील दर्शना सावंत यांच्या मागणीनुसार अखेरला सकाळी ,९.३० वाजता लांजा शिरंबवली पाली ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे. याप्रसंगी आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस पाटील दर्शना सावंत, तसेच एसटी चालक वाहक, वाहतूक निरीक्षक, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, शिरंबवली गावात या एसटी बस फेरीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत चव्हाण, श्रीधर सावंत, आत्माराम धावडे, परशुराम पवार, अशोक चव्हाण, संदीप सावंत, संतोष सरफरे, आत्माराम सावंत, रघुवीर सावंत, मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, अंगणवाडी सेविका अंजली चव्हाण, मदतनीस श्रेया सावंत, भक्तीसरफरे त्याचप्रमाणे विद्यार्थी मंथन सावंत रुंजी पवार शिरंबवली पोलीस पाटील दर्शना दिगंबर सावंत तसेच चव्हाण वाडि व सावंतवाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते













